अरोरा बोरायलीस किंवा नॉर्दन लाईट्स - निसर्गनिर्मित प्रकाशाचा अद्भूत खेळ
पृथ्वीच्या अतिउत्तरीय भागात आर्क्टिक वृत्ताच्या जवळ आकाशात अनेकदा रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा एक अनोखा खेळ पहायला मिळतो. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात हमखास हा खेळ आकाशात रंगतो. या काळात सूर्याचं दक्षिणायन सुरू असल्याने उत्तर गोलार्धात दिवस लहान असतो. अतिउत्तरीय भागात तर तो आणखीनच लहान असतो. साधारण पणे ५, ६ तासांचा दिवस बाकी १८ तासांची अंधारी रात्र. याच काळात जास्तीत जास्त वेळ अंधार असल्याने अरोरा बोरायलीस सहज दिसू शकतात. त्यांना नॉर्दन लाईट्स किंवा नॉर्डिक डान्सीग लाईट्स असेही म्हणतात.
कसे तयार होतात हे अरोराज्…
हि किरणे म्हणजे काही चमत्कार किंवा जादू नसून, त्यामागे शास्त्रशुद्ध वैज्ञानिक कारण आहे. सूर्यकिरणे सातत्याने पृथ्वीवर येत असतात. पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर ती सर्वत्र समान पसरतात आणि आपल्याला एकसारखा उजेड पहायला मिळतो ज्याला आपण सूर्यप्रकाश म्हणतो. मात्र पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ जरा वेगळी परिस्थिती असते. या ठिकाणी चुंबकीय तत्त्व अति जास्त प्रमाणात असल्याने सूर्यकिरणे उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होतात. या वेळी हिवाळा सुरू असल्याने ध्रुवीय परिसरात बहुतांश वेळ काळोख असतो. येथील चुंबकीय क्षेत्रामुळे आकर्षित झालेली सूर्यकिरणे ध्रुवीय परिसरात पसरत जातात. ही किरणे चुंबकाच्या परिणामामुळे हिरवा, जांभळा, निळसर आणि हलका पिवळा अशा रंगांमध्ये ही किरणे दिसतात. वातावरणातील विविध गॅसेस आणि सूर्य किरणांमधील विविध कण ज्यावेळी आणि तसेच मध्य भागाकडून संपूर्ण आर्क्टिक वृत्ताच्या परिसरात ती पसरत जाताना जणू काही विविधरंगी प्रकाशझोत आकाशात फिरत असल्याचा भास होतो. हेच ते अरोरा बोरायलीस किवा नॉर्दन लाईट्स.
ज्यावेळी हे रंगीत किरण एका ठिकाणहून दुसरीकडे पसरत जात असतात, त्या वेळी जणू ते डान्स करत आहेत असा भास होतो. त्यामुळेच त्यांना डान्सिंग लाईट्स असेही म्हणतात. उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी सुमारे १७, १८ तास काळोख असतो त्याचवेळी अनेकदा हे डान्सिंग लाईट्स पाहण्याची संधी मिळते.
कुठे दिसतात हे अरोराज्…
हि अद्भूत किरणे पाहण्यासाठी पृथ्वीच्या उत्तरेला अर्थातच ध्रुवीय प्रदेशालगत असलेल्या फिनलंड, नॉर्वे आणि स्विडन या तीन देशांतून ही किरणे दिसू शकतात. फिनलंड देशातील रोवानेमी शहरातून आर्क्टिक वृत्त जाते. त्यापलीकडील उत्तर भागांतून हे लाईट्स सहजरीत्या दिसू शकतात. उत्तर फिनलंडच्या प्रदेशाला लॅपलॅंड या नावाने ओळखले जाते. त्यातील सराइसेल्का, इव्हालो, किरकेननेस आदी भागांतून हे डान्सिंग लाईट्स दिसतात. तर नॉर्वेच्या ट्रोम्सो, अल्ता या शहरांतून हे लाईट्स एन्जॉय करता येतात. स्विडन देशातील किरुना, अबिस्को राष्ट्रीय उद्यान तसेच किल्पिसीयारवी, नार्विक या प्रदेशांतून या लाईट्सची मजा लुटता येते.
जगाच्या पाठीवर केवळ फिनलंड, नॉर्वे, स्विडन याच प्रदेशांतून आपल्याला हे नॉर्डिक लाईट्स अनुभवता येतात. तसे तर, कॅनडा आणि अलास्काचा अति ध्रुवीय प्रदेश, ग्रीनलॅंड, आईसलॅंड आदी देशांमध्येही हे लाईट्स दिसतात. मात्र या देशांमध्ये आपण जाऊन तिथे राहू शकू अशी परिस्थिती नाही. अतीशय शीत हवामान आणि माणसाने जिवंत रहावे अशी कोणतीही सहजसोपी साधने उदा. हॉटेल्स, दळणवळणाची साधने, संवादाची साधने इ.. त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. केवळ वर उल्लेखिलेल्या ३ उत्तर युरोपीयन देशांतूनच सहजरीत्या हे सर्व अनुभवता येते.
केव्हा जावे, कसे जावे ..
साधारणपणे दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यांमध्ये वरील तीन देशांमध्ये खास नॉर्दन लाईट्स अनुभवण्याकरीता इंतियामातकत टूर कंपनीतर्फे फिनलंड, स्विडन आणि नॉर्वे या देशांमध्ये सहली आयोजीत केल्या जातात. भारतातून वरील तीनही देशांमध्ये जाण्यासाठी विमानसेवा सपहजपणे उपलब्ध आहे. थेट सेवा नसली तरी, अनेक चांगल्या विमानकंपन्या १२ ते १४ तासांमध्ये वरील तीनही देशांमध्ये सेवा देतात. बहुतांश कंपन्या दररोज २ किंवा त्याहून अधिक सेवाही पुरवतात. दिल्ली विमानतळावरुन हेलसिंकी या फिनलंडच्या राजधानीसाठी दररोज फिन एअर कंपनीची केवळ ७ तासांत थेट सेवा उपलब्ध आहे.
या प्रदेशात प्रवेश केल्यावर पुढचे नियोजन कसे असते... तसेच, या टूर्सची काय विशेषता आहे, इंतियामातकत टूर कंपनीकडे या टूर साठी कोणकोणती विशेष पॅकेजेस उपलब्ध आहेत या सर्वांविषयी आणि टूरच्या नियोजनाविषयी जाणून घ्या या लेखमालेच्या पुढच्या भागात.