top of page

‘इंतियामात्कात’ विषयी थोडेसे...


‘इंतियामात्कात’ ही टूर कंपनी चालविणारे शिरीन व हेरंब कुलकर्णी हे मूळचे पुण्याचे रहिवासी. मात्र जवळपास 17 वर्षांपुर्वी ते फिनलंड या देशात स्थायीक झाले. पेशाने इंजिनीअर असलेल्या हेरंब यांनी नोकिया कंपनीत काही काळ उच्च पदावर नोकरी केली, त्यानंतर अन्य काही टेक्नो कंपन्यांमध्येही त्यांनी नोकरी केली. त्यादरम्यान फिनलंड सह स्विडन, नॉर्वे, डेन्मार्क आणि अन्य दक्षिण युरोपीयन देशांमध्ये ते खुप फिरले. तेथील अनेक भागांची त्यांना इत्यंभूत माहिती आहे. स्कँडिनेव्हियन देशांतील विविध माहितीचा, संस्कृतींचा तर खजिनाच जणू त्यांच्याकडे आहे. अखेरीस २०११ सालापासून त्यांनी ‘इंतियामात्कात’ नावाने टूर कंपनी सुरू केली.

‘इंतिया’ म्हणजे इंडिया. ‘इंतिया’ हा फिनिश भाषेतील शब्द आहे. तर, ‘मात्कात’ म्हणजे एखाद्या प्रदेशाची भटकंती करत, त्याविषयीची संपूर्ण माहिती घेणे, ओळख करुन घेणे. ‘इंतिया’ आणि ‘मात्कात’ या दोन फिनिश टर्म वापरुन त्यांनी ‘इंतियामात्कात’ नावाने ही टूर कंपनी सुरू केली. सुरुवातीला फिनलंड तसेच अन्य युरोपीयन देशांतील नागरिकांना त्यांनी भारतात पर्यटनास आणण्यास सुरुवात केली. तेथील नागरिकांच्या मनातील भारतीविषयीची प्रतिमा बदलण्याचा उद्देश त्यामागे होता. साधारणपणे वर्षभरात २५० ते ३५० युरोपीयन्स् ना भारतात आणण्यात इंतियामात्कात कंपनीचा मोठा सहभाग आहे. गत ६ वर्षांपासून ही पर्यटन सेवा सुरू आहे. तसेच भारतीयांना उत्तर युरोपीयन देशांची ओळख व्हावी या उद्देशाने गेल्या ५ वर्षांपासून स्कँडिनेव्हियन देशांच्या टुरीझमची संकल्पना पुढे आली. त्यातून मग सुरू झाले नियोजन.. या प्रदेशांतील दोन मुख्य सिझन पर्यटनासाठी सुरू करण्याचे. एक म्हणजे मध्यरात्रीचा सूर्य आणि दुसरा थंडीमध्ये अरोरा बोरायलीस किंवा नॉर्डिक डान्सिंग लाईट्स.

या प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सर्व भूभाग पृथ्वीच्या अतिउत्तरीय भागात असल्याने येथे उन्हाळ्यात जवळपास २४ तासांचा दिवस असतो. १ जून ते १५ जूलै चा हा काळ. याच दरम्यान मध्यरात्री १२ वाजताही येथे सूर्य दिसतो आणि थंडीच्या सिझनला १ डिसेंबर ते ३१ जानेवारीच्या दरम्यान येथे संपूर्ण रात्र असते. सुमारे २२ तास काळोख आणि मध्येच थोडावेळ उजाडते व लगेचच अंधार होतो. त्याचवेळी प्रचंड बर्फ त्यामुळे तपमानही या काळात उणे १४ ते उणे २२ अंशांपर्यंत खाली असते. त्याचवेळी दिसतो हा प्रकाशाचा अद्भूत खेळ.

गेल्या ५ वर्षात या दोन्ही सिझनसाठी सुमारे १००० भारतीयांनी इंतियामात्कात टूर कंपनीच्या माध्यमातून उत्तर युरोपीयन देशांना भेट दिली आहे. हे निसर्गाचे आविष्कार पाहण्यासारखी दुसरी पर्वणी नाही अशीच प्रत्येकाची प्रतिक्रिया आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे.. या अवर्णनीय गोष्टी पाहण्यासाठी स्कँडिनेव्हियन देशांव्यतीरिक्त अन्य कुठलाही पर्याय सहजी उपलब्ध नाही. तर मंडळी आता वाट कसली पाहताय.. चला तर मग डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात नॉर्दन लाईट्स पाहण्यासाठी इंतियामात्कात कंपनीतर्फे सर्वसमाविष्ट सहली उपलब्ध आहेत. आयुष्यात एकदा तरी घ्यावा असा अनुभव आहे हा.. त्यामुळे ही सुवर्णसंधी सोडू नका.. आमच्या www.intiamatkat.fi या वेबसाईटला भेट द्या आणि नॉर्दन लाईट्स या सहलीचे सर्व डिटेल्स जाणून घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

info@intiamatkat.fi

suomi@intiamatkat.fi

Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • Google+ Basic Square
bottom of page